पाठ 3
आपल्या आशेच्या अधिक केंद्रस्थानी हे जाणून घेणे आहे की येशू मेलेल्यांतून उठला आणि सदासर्वकाळ जिवंत आहे. जर येशू अजूनही मृत असता, तर आपण त्याचे जीवन अनुभवू शकलो नसतो. तरीही आपल्या मध्ये राहणारा त्याचा आत्मा हा त्याने दिलेल्या सर्वात मोठ्या दानांपैकी एक आहे.
देवासोबतचे जीवन काही अंशी शक्य झाले कारण त्याच्या मृत्यूने आपल्याला त्याच्या नजरेत शुद्ध केले, परंतु तो मेलेल्यांतून उठून आणि स्वर्गात व आपल्यामध्ये सदैव जगत असल्यामुळे ते खरे झाले आहे. अशा प्रकारे आपण मेल्यानंतर सदैव जगण्याचे अभिवचन आपल्याला मिळाले आहे, कारण आपले तुटलेले जीवन काढून घेतले जाईल आणि फक्त त्याचे कधीही न संपणारे जीवन उरेल.
येशू पूर्ण देव आहे, आणि पूर्ण मानव आहे. आदाम आणि हव्वा, पहिला पुरुष आणि स्त्री, यांना सदैव जगण्यासाठी बनवले होते, परंतु त्यांच्या वाईट निर्णयामुळे त्यांचा मृत्यू झाला. वाईट तेच आहे जे आपल्यालाही मारून टाकते. वाईमुळेच आपण सर्व मरतो, परंतु येशू सदासर्वकाळ जीवंत आहे कारण त्याने कधीही वाईट केले नाही. हे दर्शवते की तो देव होता कारण फक्त देवच परिपूर्ण आहे.
जरी येशू मेला, तरी वाईटाने त्याला मारले नाही. त्याने स्वेच्छेने आपले जीवन दिले, आणि मृत्यू त्याला रोखू शकला नाही कारण त्याने कधीही चूक केली नाही. त्याच्या शुद्धतेने त्याला त्याचा जीव परत मिळविण्याचा अधिकार दिला.
तर, त्याने तेच केले.
येशू पुन्हा जिवंत झाला, त्याचे सामर्थ्य, देवत्व, परिपूर्ण मानवता, आणि आपल्याला जीवन देण्याची व आपल्याला मेलेल्यातून परत उठवण्याची क्षमता दर्शवित असताना. पण त्याहीपेक्षा अधिक, तो परत यासाठी आला जेणेकरून आपण त्याच्याशी कायम घनिष्ठ मैत्रीमध्ये जगू शकू.
यावर थोडा विचार करूया.
आपल्याला कधीही एकटे राहण्याची गरज नाही कारण तो आपल्या आत राहतो. आपण प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक क्षणी त्याच्याकडे जाऊ शकतो. आपण त्याच्याकडे प्रार्थना करू शकतो आणि त्याच्या भावना आपल्या अंतःकरणात कार्य करताना अनुभवू शकतो. तो आपले विचार जाणून आहे आणि आपल्यावर प्रीती करतो. तो आपल्याला शुद्धतेने जगण्याचे सामर्थ्य देतो. आपण त्याच्या प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन या सर्वांमध्ये जगू शकतो. जेव्हा आपण त्याच्यामध्ये आपले जीवन प्राप्त करतो, तेव्हा तो आपल्याला विपुल जीवन देतो.
बायबल सांगते की आपल्या अस्तित्वाचे कारण येशूसोबत जवळच्या नातेसंबंधात राहणे आहे. पृथ्वीवरील इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा त्याच्या जवळ राहण्यासाठी. कोणत्याही गोष्टीपेक्षा किंवा इतर कोणाहीपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करण्यासाठी. आणि आनंदाने सदैव त्याची आज्ञा पाळण्यासाठी व त्याची उपासना करण्यासाठी.
आपण येशूवर प्रीती करण्यासाठी आणि त्याच्यासोबत राहण्यासाठी अस्तित्वात असल्यामुळे, बायबल ख्रिस्ती लोकांना "ख्रिस्ताची नवरी" असे संबोधते. बायबल असेही सांगते की जो कोणी त्याला नाकारतो तो दोषी ठरविला जातो. आमचे गंतव्य येशूचे हात आहे. येशूचा तिरस्कार करणारा कोणीही अंततः त्याच्या हाताकडे जाऊ शकणार नाही; त्याऐवजी, ते त्याच्यापासून कायमचे वेगळे केले जातील.
ही एक भयानक गोष्ट आहे ज्याची कल्पना काही जण करू शकतात. अनेकांना हे समजत नाही की आपल्याकडील कोणतेही जीवन किंवा आनंद देवाकडून येतो. जीवनात, आपल्याला साधे सुख उपलब्ध आहे कारण त्याने ते आपल्याला उपलब्ध करून दिले आहे. जेव्हा आपण मरतो, तेव्हा ते सर्व काढून टाकण्यात येते, आणि एकतर आपल्याकडे येशू आणि अंतहीन आनंद असेल, किंवा वेगळेपणा आणि वेदना त्यांच्या भयानकतेसह असतील.
आपण पाहू लागतो की येशूचे हात हे विश्वातील सर्वात मोठे गंतव्यस्थान आहे. हे तथ्य की आपण त्याच्यासोबत आता शांती आणि जीवन अनुभवू शकतो हाच जीवनातील सर्वात मोठा आनंद आहे. कोणताही व्यक्ती जो खऱ्या रीतीने येशूच्या जवळ राहिला आहे, तो तुम्हाला दाखवून देईल की येशू सर्वांपेक्षा चांगला आहे.
सुरुवातीला, त्याला आपल्या प्राणामध्ये प्रवेश करण्याची अनुमती देणे भयंकर वाटते कारण तो आपल्या वाईटाचा पर्दाफाश करतो आणि आपल्याला समर्पण करण्यास प्रवृत्त करतो. पण जेव्हा आपण समर्पण करतो, तेव्हा तो चांगले आरोग्य देतो आणि आपल्याला सहन करण्याची व वाढण्याची शक्ती देतो.
जर तुम्ही येशूच्या मागे जाऊन त्याच्याकडे समर्पित झालात, तर तो तुमचा सर्वात मोठा आनंद होईल, आणि तो तुमचे जीवन बदलून तुम्हाला शुद्ध करेल.
मग, तुमचा मृत्यू झाल्यानंतर, तुम्ही स्वर्गात त्याच्या हातांमध्ये असाल.
खोलवर पहा
रोमकरांस पत्र 1:1-7, 1 करिंथकरांस पत्र 15:1-5, आणि रोमकरांस पत्र 10:9-10 वाचा. हे पुनरुत्थान झाल्यानंतर पुनरुत्थानाचे तपशील आहेत. नंतर दानीएल 12:2, ईयोब 19:23-27, यशया 26:19-21, होशेय 6:1-2, गणना 21:9 (या संदर्भाचा अर्थ समजण्यासाठी योहान 3:14-15 देखील वाचा), स्तोत्र 16:9-10, आणि स्तोत्र 71:19-24 वाचा. हे येशूच्या पुनरुत्थानाबद्दल आणि त्याच्याशी विश्वासयोग्य राहून मरणाऱ्यांचे तपशील आहेत, जे येशूने पृथ्वीवर येण्याच्या खूप आधी लिहिले गेले आहेत. येशूच्या पुनरुत्थानाचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे, आणि तुमच्या मते त्याला मेलेल्यांतून उठवले जाणे महत्त्वाचे का आहे ते लिहा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील, तर दुसऱ्या एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीशी त्याबाबत चर्चा करा.